जळगाव लाईव्ह न्युज । ५ एप्रिल २०२२ । शहरात असलेल्या इतर स्वस्त धान्य दुकान सुरळीत धान्य वाटप सुरू होते, परंतु भोई वाड्यातील पंधरा नंबरचे स्वस्त धान्य दुकान काही अपरिहार्य घडल्यामुळे कोचुर येथील धान्य दुकान दाराशी अतिरिक्त देण्यात आले आहे. हे भोई वाड्यात असलेले १५ चे नंबर स्वस्त धान्य दुकान जोडल्याने व ते दुकान शहरातील इतर दुकांनाच्या वेळे नुसार उघडत नसल्याने सोमवारी सकाळी नागरिकांनी सकाळी ५ वाजे पासून रांगेत उभे राहून आपले नंबर रेशन चे धान्य घेम्य साठी लावले परंतु दुकान उघडायची वेळ संपली तरी स्वात धान्य दुकान दार न आल्याने एकच गर्दी झाली. त्यात स्वस्त दुकान धान्य दुकानदार यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधून विचारणा केल्याचा प्रयत्न केला असता ते उचलत नसल्याने त्यात नागरिकांचा संताप झाला. यावेळी ही बाब काही नागरिकांनी माजी नगरसेवक श्यामकांत पाटील ,पिंटू धांडे यांना भ्रमण ध्वनी व लक्षात आणून देताच त्यांनी तालुक्याचे स्वस्त धान्य दुकानदार यांचे पुरवठा अधिकारी अधिकारी डी के पाटील यांच्याशी वार्तालाप करून संबंधित बाब त्यांच्या लक्षात आणून दिली असता ते संपावर असून सुदधा त्यांनी सावदा येथे येऊन संबंधित धान्य दुकानदार यांना बोलावून pos मशीनचे इंजिनियर मोहसीन खान व ज्या दुकानदाराकडे या दुकानाचा विस्तारित चार्ज देण्यात आला आहे त्या दुकानदाराला बोलावून धान्य घ्या साठी सकाळ पासून धान्य मिळण्याचा प्रतीक्षेत असलेले नागरिकान या अंदाजे शंभर लोकांचे धान्य वाटप सुरळीत केले व नागरिकांना या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले.
पण काही नागरिकांचे म्हणणे असे होते की ज्या भागातील रहिवासी नागरिक आहे त्या भागापासून हे स्वस्त धान्य दुकान कमीत कमी एक ते दीड किलोमीटर अंतरावर असल्याने खूप लांब आहे ते त्या भागातच जवळ असावे,बाहेर गावच्या स्वस्त धान्य दुकानदाराशी हे शहरातील दुकान जोडल्याने त्याची शहराच्या इतर दुकानाच्या तुलनेत वेळेची अनियमितता असल्याने हे स्वस्त धान्य दुकान शहरातील स्वस्त धान्य दुकानदार अतिरिक्त जोडले जावे. अन्यथा आंदोलन करू असे उपस्थित स्वस्त धान्य नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला