राष्ट्रीय युवा संसद मध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा !

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे केंद्र शासनाकडुन यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडुन राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. युवा संसदसाठी जिल्हास्तरावर ऑनलाईन पध्दतीने संसद घेण्यात येणार असुन जास्तीत जास्त युवक – युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी केले आहे.

युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसीत व्हावे, देशाच्या समाजकारणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवष्यक असते. जळगाव जिल्हाची युवा संसद दि. 27 आणि 29 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

जिल्हातील युवकांना आवाहन
जळगाव जिल्हातील युवकांना जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा पुरावा रहिवासी दाखला पुरावा पासपोर्ट फोटोसह आपले अर्ज नेहरू युवा केन्द्र, प्लॉट 40 गट नं 60 मानराज पार्क द्रोपती नगर जळगाव 425001 या ठिकाणी दि. 25 जानेवारी 2023 पर्यत कार्यालययीन वेळेत सकाळी 10-00 ते सायंकाळी 05.00 पर्यत जमा करायचे आहे. अधिक माहितीसाठी 0257 ‌2951754 यावर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 24-01-2023 पर्यंत 18 ते 25 राहणार असुन प्रत्येक सहभागी युवकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर मराठी हिंदी आणि इंग्रजी भाशेत आपला मुद्दा मांडता येणार असुन राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषा आवश्यक आहे.

महत्वपूर्ण विशयावर युवा मांडणार मत
जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी 4 मिनीटे वेळ मिळणार आहे. स्पध्ये करिता विषय लवकरच कळविण्यात येईल.

राष्ट्रीय स्तरावर लाखोंची बक्षीसे मिळणार
ज्यस्तरीय युवा संसदसाठी जळगाव जिल्हात आयोजित स्पर्धेतून 2 युवक – युवती निवडले जाणार असुन राज्यातून 3 युवा देषस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा दि. 3 ते 7 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पध्दतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद दि. 23 ते 24 फेब्रुवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणा-या युवकांना प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस 2 लाख द्वितीय 1-5 लाख तृतीय बक्षीस 1 लाख असणार आहे.