⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ | जळगाव शहरात व परिसरात १९ जून रोजी विजांचा कडकडाट व जोरदार वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. यावेळी शहरात विविध ठिकाणी वृक्ष कोलमडली. ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याच बरोबर झाड कोसळल्याने नगरीकांसोबत प्राणी पक्षांचे मोठे नुकसान झाले.

जळगाव शहरासह तालुक्याच्या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. काही भागात पावसाआधी आलेल्या वादळाने धुमाकूळ घातला. गटारींना पूर आला. अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने शहर पणिमय केले.


पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडे पाहून त्यांच्या आडोश्याला उभे राहणे शक्यतो टाळावे वारंवार करण्यात येत आहे. आता नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे कृत्य करू नये असे आवाहन जळगाव लाईव्ह करत आहेत.