⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

शासकीय रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेचा पाय घसरून मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाळधी येथील ३८ वर्षीय महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  दरम्यान, महिलेला योग्य उपचार मिळाले नसून, जीएमसीच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला दम लागत होता. त्यामुळे ही महिला दोन दिवसांपूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती. या महिलेला सी टू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान ही महिला पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे; परंतु संबंधित महिलेवर योग्य उपचार झाले नसल्यामुळे जमिनीवर पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अारोप कुटंुबीयांनी केला आहे.

यात प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचाही आरोप नातेवाइकांनी केला. दरम्यान, रात्री प्रशासनाने समजावल्यानंतर तिचा मृतदेह शवागारमध्ये ठेवला आहे.