जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । क्रांतिसूर्य महाराणा प्रताप महाराजांचे यांचे जयंतीचे औपचारिकता साधून जळगाव नगरीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान .व राजपूत समाज मित्र मंडळ .जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप चौक जळगाव येथे शांतीदूत मर्दानी आखाडा कोल्हापूर यांच्या शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक उत्साहात झाले.
सर्वप्रथम शस्त्रपूजनाचा कार्यक्रम जळगाव शहराचे आमदार मा राजू भोळे यांच्या हस्ते झाला. क्रांतिसूर्य महाराणा प्रताप व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस ह .भ।प.श्री गजानन महाराज वरसाळेकर. जळगाव शहराचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
त्या वेळीच प्रमुख पाहुणे म्हणून मा .राजकुमारजी बाफना (आर सी बाफना गौशाळा )मा.संतोष जी भंडारे (पोलिस निरीक्षक जिल्हापेठ पोलिस स्टेशन जळगाव )
चंद्रकांत उदयसिंग पाटील. मा. अतुलसिंह हाडा.मा.गोपाल कौतिक पाटील (साई पॅथॉलॉजी ), देवसिंग पाटील (श्रीकृष्ण एजन्सी )मा.रणजितसिंह पाटील (जिल्हा करणी सेना )मा नीलेश सिंह राजपूत (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य करणी सेना )मा.अशोक लाडवंजारी राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठा युवा हिंदुस्थान चे (जळगाव जिल्हा प्रमुख )गजानन माळी यांनी सर्व शस्त्रांची उपस्थितांना कार्यक्रमास हजर असलेल्या सर्वांना सखोल माहिती सांगितली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक दाभाडे यांनी केले.कार्यक्रमचे यशस्वीतेसाठी दिनेश खारक.सदिप दाभाडे.सुमीत गोयल.नरेंद्र दिवेकर.संतोष पाटील .यांचे सह वरील तिन्ही मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले .