जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चक्क प्रसाद ओक या मराठी अभिनेत्याचे पाया पडले. यामुळे याचे कारण जाणून घेण्याची सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
तर झाल अस कि, ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टीझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे.नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा म्हणजेच म्युझीक लॉन्च मुंबईत झाला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी या सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंच्या लूकमध्ये मंचावर अवतरला. यावेळी एकनाथ शिंदे त्याला पाहून भारावून गेले. संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर मंचावर सगळे फोटो काढण्यासाठी एकत्र जमले होते. सुरुवातीला प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांसोबत फोटो काढले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे सर्वांदेखत प्रसाद ओकच्या पाया पडले.