जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । येथील मेहरूण भागात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते गोपीनाथरावजी मुंडे चौक येथे प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा व भव्य सत्कार कार्यक्रम शनिवार दि. ७ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे दि. ७ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्यात संध्याकाळी ते मेहरूण येथे गोपीनाथरावजी मुंडे चौक येथे उपस्थिती देणार आहे.
चौकात मेहरूण गावाचे भव्य प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. या प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा संध्याकाळी ६ वाजता धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ना. मुंडे यांचा भव्य सत्कार देखील आयोजक समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे केला जाणार आहे. समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय वंजारी, सचिव प्रवीण सानप यांनी केले आहे