⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

क्षणात स्वप्न जळून खाक झालं! ७० क्विंटल मक्काला आग लागल्याने शेतकऱ्यांच नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । भुसावळ तालुक्यातील पिचर्डे परिसरात ७रोजी अचानक लागल्यामुळे आगीमुळे ७० क्विंटल मक्का व चारा जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत भडगाव पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, अशोक धर्मराज पाटील (वय-५२) रा. पिचर्डे ता. भडगाव याचे पिचर्डे शिवारात शेत आहे. शेतात ७० क्विंटल काढलेला मका आणि चारा होता. दरम्यान ७ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मका आणि चारा जळून खाक झाला आहे. या आगीत ६५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक एकनाथ पाटील करीत आहे.