fbpx

जि.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी चैतन्य तांड्याला दिली सदिच्छा भेट

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त झाल्याने चाळीसगाव दौऱ्यावर असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सदिच्छा भेट देऊन तांड्याची पाहणी केली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे गुरूवार रोजी चाळीसगाव दौऱ्यावर होते. दरम्यान तालुक्यातून एकमेव चैतन्य तांडा ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त झाल्याने डॉ. पंकज आशिया यांनी सदिच्छा भेट देऊन तांड्याची पाहणी केली. त्याचबरोबर तांड्यात राबविल्या गेलेल्या विविध योजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

लोक लोकसहभागातून झालेल्या विकास कामाबाबत डॉ. पंकज आशिया यांनी प्रशंसा केली. उपसरपंच आनंदा राठोड यांनी डॉ. पंकज आशिया यांना फूल देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत केले. दरम्यान मुख्खाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे आचर्य व्यक्त होत आहे.

यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे सचिव संजीव कुमार निकम, तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष येवले भाऊसाहेब, विलास आबा, विस्ताराधिकारी कैलास माळी, विस्तार अधिकारी आर. आय. पाटील, माजी चेअरमन दिनकर राठोड, , सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, मंगेश राठोड, संतोष पवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज