fbpx

जि.प. बैठकीत नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय गाजणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । जिल्हा परिषदेतर्फे जळगाव जिल्ह्यात आरोग्य समिती स्थापन करण्यात आली असून पाचोरा तालुका आरोग्य समितीवर पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य शासनाने संपूर्ण राज्यभरात लसीकरणावर जोर दिला असून जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात लसीकरणाची मोहीम सुरु आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पाहता आरोग्य समितीवर नियुक्त असलेले पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचारी वीरेंद्र पाटील व दहाडे मॅडम हे लसीकरण संदर्भात मनमानी कारभार करत असून मी समितीवर असताना मला विश्वासात न घेता न विचारता परस्पर निर्णय घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. आरोग्य केंद्रात किती लसी प्राप्त झाल्या व किती वाटप झाल्या व कोणत्या ठिकाणी वाटप करण्यात आल्या करण्यात आल्या या संदर्भात अद्याप माहिती न देता आपला मनमानी कारभार करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे सभापती वसंत गायकवाड यांनी सांगितले.

mi advt

उद्या दि.५ रोजी जि.प.ची दुपारी एक वाजता बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा विषय गाजनार आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदलीविषयीचा प्रश्न उपस्थित होणार असून त्यांची बदली न झाल्यास तालुका आरोग्य समितीवर असलेले पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड हे समितीवर असलेल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सभापती वसंत गायकवाड यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज