जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । सध्या उन्हाच्या तडाख्याने सर्व नागरिक हैराण आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वेळ सकाळी करण्याची विद्यार्थी व पालक वर्गात मागणी होती त्याची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळात बदल करून शाळेची वेळ सकाळी करण्यात यावी अशी मागणी युवासेनेतर्फे निवेदनातून करण्यात आली.
शालेय पोषण आहार वर्षभरात किती व कसा वाटप होणार याचे वेळापत्रक पालकांना देण्यात यावे तसेच विद्यार्थी वर्गाच्या काही अडचणी होत्या या संदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री सपकाळे यांना निवेदन देण्यात आले. शाळेची वेळ कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या दोन दिवसात शाळेच्या वेळात बदल करण्यात येईल अशी ग्वाही उपशिक्षणाधिकारी सपकाळे सरांनी दिली. यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, विभाग प्रमुख अमोल मोरे , युवासैनिक सागर कुटुंबळे, सनी सोनार आदि शिवसैनिक उपस्थित होते.