fbpx

‘युवक बिरादरी नवनियुक्त जिल्हा पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न’

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । देशभरातील युवकांसाठी गेल्या ४७ वर्षापासून युवा विकासासह समाजाभिमुख कार्य करणारी युवक बिरादरी (भारत) या देशव्यापी चळवळीच्या खान्देश युवक बिरादरी अंतर्गत जळगाव जिल्हा, युवक बिरादरीची नुतन कार्यकारणी बिरादरीचे अध्यक्ष पद्मश्री क्रांती शहा यांनी नुकतीच जाहीर केली असून सदर जिल्हा कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ जळगाव येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ बिरादार तथा कार्यकारी संचालक प्रा.विजेंद्र पाटील (अमळनेर) यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक बिरादरीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य प्रसन्न पाटील (मनमाड) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भंडारा जिल्हा युवक बिरादरीचे कार्यकारी संचालक प्रशांत वाघये (भंडारा) उपस्थित होते. नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष म्हणून जळगाव शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा बॉक्स ऑफ हेल्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा काबरा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.उज्वला राठी (एरंडोल), डॉ.तनूज पाटील (भुसावळ), कार्यकारी संचालक प्रा.विजेंद्र पाटील (अमळनेर), विशेष निमंत्रित सदस्य तथा मार्गदर्शक म्हणून कबचौ उमवि रासेयो विभागाचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे (चाळीसगाव), जिल्हा समन्वयक आकाश धनगर (जळगाव), जिल्हा समन्वयक अनिल बाविस्कर (चोपडा) यांचा समावेश आहे,
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदाची शपथ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून युवक बिरादरीच्या कार्याची माहिती दिली. युवक बिरादरीच्या माध्यमातून आगामी काळात जिल्ह्याभरात ‘एक सूर – एक ताल’, हिरवे आंगण, युवा भूषण स्पर्धा, वसुंधरा स्नेही, युवा सारथी – अभिरूप युवा संसद, ग्राहक स्नेही अभियान, युवा छावणी शिबीर आदी उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती भंडारा जिल्हा युवक बिरादरीचे कार्यकारी संचालक प्रशांत वाघये यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ बिरादर राजेंद्र साठे, मुकुंद भालेराव, युवा बिरादर विलास पाटील, रोहन अवचारे, कु.किरण तायडे, अंजली मोरे, पालवी पाटील, केशव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बाविस्कर यांनी केले तर आकाश धनगर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt