fbpx

पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; वरणगावातील तरुणाचा ओझरखेडा येथील धरणात बुडून मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । वरणगाव शहरातील चार मित्र फिरण्यासाठी ओझरखेडा येथील धरणावर गेले होते. त्यातील एकाला पोहण्याचा मोह आवरता न आल्याने पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार रोजी सायकाळच्या सुमारास घडली. कैलास राजेंद्र पालक ( २१ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

याबाबत असे की, शहरातील नारीमळा येथील रहिवाशी असलेला कैलास पालक  हा त्याचा तीन मित्रा सोबत येथुन जवळच असलेल्या ओझरखेडा येथील धरणावर फिरण्यासाठी दुपारी गेले होते मात्र त्यात कैलासला पोहण्याचा मोह आवरता आला नाही त्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता धरण्याच्या पाण्यात उडी मारली  दोन मिनिट झाले तरी  तो पाण्याच्या वर न आल्याने सोबतच्या सहकाऱ्यानी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली तेथून जाणाऱ्या ट्रॉक्टर चालकाने ट्रॉक्टर थाबवुन  आवाजाच्या दिशेने धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो वर उशीर झाला होता मयत कैलास याला पाण्याबाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदना साठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले 

घटनेची खबर ओझरखेडा सरंपच विकास पाटील यांनी दिली असुन घटना नोंद करण्याचे काम रात्री उशीरा पर्यत सुरू होते

सदर मयत हा वरणगाव पोलीस स्टेशनला गृहरक्षक दलाचे राजेंद्र एकनाथ फालक याचा मुलगा होता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज