fbpx

पाटणादेवीच्या धवलतीर्थ धबधब्यात बुडून अज्ञात तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी तीर्थक्षेत्र परिसरातील धवलतीर्थ धबधबा येथे एका 18 वर्षाच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार रोजी दुपारी घडली.

आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास सांगवी बोढरे या गावातील चार ते पाच तरुण पाटणादेवी तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर हे तरुण मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या धवलतीर्थ धबधब्याजवळ डोहात पोहायला गेले. दरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यात एक 18 वर्षाचा तरुण बुडाला.

या परिसरामध्ये पोहण्यासाठी सक्त मनाई करण्यात आलेली असताना देखील या तरुणांनी तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातील एक तरुण आपले प्राण गमावून बसला. पाटणादेवी वनक्षेत्रात कंत्राटी वनमजूर असलेल्या कैलास चव्हाण यांनी त्या युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दरम्यान मयत तरुणाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. घटनास्थळी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घेऊन पंचनामा केला आहे. व पुढील तपास चालू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज