fbpx

सार्वे पिंप्री येथील युवकाचा सर्पदंशाने मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील सार्वे पिंप्री येथील २२ वर्षीय तरूणाचा आज ता. २८ रोजी दुपारी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली.जाबीर आयुब शेख (वय – २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सविस्तर असे की, जाबीर व त्याचे वडील आयुब शेख यांचे कुटुंब नेहमी दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करून पोट भरत असतात. दि. २८ रोजी रविवारी दिवसभर लाईट असल्याने जाबीरचे वडील आयुब शेख दुसऱ्याच्या शेतावर मजुरीवर बाजरीचा भरणा करण्यासाठी गेलेले होते. त्यांचा जेवणाचा डबा घेऊन जाबीर शेख शेताच्या  बांधाणे जात असतांना एका विषारी सर्पाने त्याला चावा घेतला. मात्र त्याला असे वाटले की, आपल्या पायाला काडी टोचली की काय, म्हणून त्यांने दुर्लक्ष केले.

आपणास काही चावले की काय असे बारकाईने चौकशी न करता जवळपास चार तासांचा वेळ निघून गेला. नंतर त्यास चक्कर येत असल्याचे लक्षात येताच, पिंपळगाव (हरे.) येथील डॉ. चव्हाण यांचे दवाखान्यात नेले. त्यांनी दुसरीकडे हलविण्याचे सूचित केले. लगेच येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी मोहिते जोहरे यांनी ताबडतोब पाचोरा येथे नेण्याचे सूचित केले. मात्र तोपर्यंत खूप वेळ होऊन गेलेला होता. रस्त्याने नेत असतांना वाटेतच सदर तरुणाने प्राण सोडला सदर तरुणाचे एक वर्षापूर्वीच लग्न झालेले असून,  त्यास मुले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज