fbpx

व्हाट्सअँप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२१ । जळगावातील आयोध्या नगर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने गळफास घेत राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.

अयोध्या नगर परिसरातील सद्गुरु नगर तृप्ती कॉर्नर जवळ राहणाऱ्या हर्षल प्रेमनाथ महाजन या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, तरुणाने व्हाट्सअपला स्टेटस ठेवत माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याश्या जीवनाचा प्रवास खूप छान केला.

काही लोकांच्या मनावर, अनेकांच्या डोक्यात अधिराज्य केले आणि मित्रपरिवार छान लाभले. माझे आई-वडील हे दुनियातील खूप छान देव माणूस आहे. पुढचा जन्म त्यांच्या पोटी जन्माला ही देवाला प्रार्थना करतो आणि मी कोणालाही याचे जीमेदार समजत नाही. कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो मला माफ करा. असे स्टेटस ठेवून तरुणाने आत्महत्या करीत जगाचा निरोप घेतला.

सदर घटना स्थळी पोलीस अंमलदार हेमंत कळसकर चंद्रकांत पाटील यांनी लागलीच पोहोचून पुढील कारवाई केली आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज