जळगावात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील मंगलपुरी-रामेश्वर कॉलनी परिसरातील एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी उघडकीस आली. भीमराव रमेश तिलोरे (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

भीमराव रमेश तिलोरे (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) हा तरुण कुटुंबासह वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारी घरात कोणीही नसताना त्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरची मंडळी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मृतदेह खाली उतरवला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृत भीमराव याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. यानिमित्त एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हेडकाॅन्स्टेबल रामकृष्ण पाटील, संदीप धनगर यांचे सहकार्य लाभले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज