एरंडोल येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास येथील अमळनेर दरवाजा परिसरातील युवा शेतकरी दीपक संतोष पाटील (वय-२९ वर्ष) याने बस स्थानक आवारातील शौचालयाच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या मागचे कारण अजून अस्पष्ट आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल येथील दीपक संतोष पाटील याच्या कुटुंबात आई-वडील भाऊ असा परिवार आहे त्याच्याकडे चार बिघे शेती असून तो अविवाहित आहे गुरुवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे रुमाल खांद्यावर टाकून तो बसस्थानकाकडे निघाला त्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे घरात थांबून आई-वडिलांच्या पाया पडला. त्याचा लहान भाऊ विनोद हा नगरपालिकेत खाजगी नोकरी करतो.
या घटनेबाबत मूर्त तरुणाचा भाऊ विनोद पाटील याने एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली. रुमालाचा गळफास घेऊन दीपक याने आपली जीवन यात्रा संपवली.

दीपक हा रात्री बराच वेळ पर्यंत घरी परतला नाही म्हणून त्याचा शोध घेण्यात आला शेवटी बसस्थानक आवारात निंबाच्या झाडाखाली गर्दी दिसली त्यावेळी त्या ठिकाणी दीपक ची ओळख पटली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दीपक चे प्रेत खाली उतरवून खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याची आर्थिक स्थिती हालाखीची होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -