जळगावात दुचाकी चोरीचे सत्र थांबेना, तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ ।  जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडतच असून आता शहरातील नवीन बी.जे. मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली.  याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील ज्ञानेश्वर मंगा कुंभार (वय-३५) हा तरूण खासगी कामाच्या निमित्ताने शहरातील जुने बी.जे. मार्केट परिसरातील कृष्णा भरीत सेंटर येथे ६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ एक्यू ०४३९) ने आला. त्यावेळी भरीत सेंटर समोर दुचाकी पार्कींग करून कामासाठी निघून गेला.

अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किंमतीची पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आली. ज्ञानेश्वर कुंभार यांनी दुचाकीचा परिसार शोध घेतला पंरतू आढळून आली नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दिली. ज्ञानेश्वर कुंभार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज