दुर्दैवी ! वाढदिवसाच्या दिवशी जिन्यावरून पडल्याने तरुणीचा मृत्यू

दिवाळीला

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । एकीकडे दिवाळी आणि वाढदिवसाचा आनंद असताना बारावीच्या विद्यार्थिनीचा लाेखंडी जिन्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भुसावळ तालुक्यातील खडका येथे घडली. नेहा सुधाकर काेळी (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे. दिवाळीला वाढदिवसाच्या दिवशी नेहाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत असे की,  खडका येथील सुधाकर काेळी यांची मुलगी नेहा ही गावातील ज्ञानज्याेती विद्या मंदिरात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरूवारी सकाळी ती शेतात लाणी (ज्वारीचे कणसं कापणे) करायला गेली हाेती. तेथील काम आटाेपून ती घरी परतली. यानंतर शेजारी राहात असलेले दिलीप पाटील यांच्या गच्चीवर त्यांचे तांदूळ वाळत टाकलेले हाेते. ते तांदूळ घेऊन ती लाेखंडी जिन्याने खाली उतरत हाेती. नेमके यावेळी पाय घसरून ती जिन्यावरून खाली पडली. हा जीना जमिनीपासून सुमारे २० ते २५ फूट उंच आहे.

मृतदेह पाहून आई-वडिलांचा टाहो
मुलीच्या मृत्यूची वार्ता कळताच आई-वडिल, भाऊ, बहीणने टाहो फोडला. त्यांना परिसरातील रहिवाशांनी धीर दिला. विशेष म्हणजे गुरुवारी दिवाळीच्या दिवशी (दि.४) नेहाचा वाढदिवस हाेता. एकीकडे दिवाळी आणि वाढदिवसाचा आनंद असताना तिच्या काळाने झडप घातली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज