fbpx

१९ वर्षीय तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

mi-advt

पारोळा तालुक्यातील टिटवी येथे ६ रोजी रात्री १० वाजता विहिरीत उडी मारून १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. आशाबाई पुना खैरनार (वय १९)  असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आशाबाई  खैरनार ही ६ रोजी रात्री ९ वाजता मोठी बहिण खटाबाई यांच्याकडे जेवणास जाते असे सांगून गेली. ती बराच वेळ झाल्यानंतरही घरी परतली नाही. त्यामुळे शिवदास पुना खैरनार यांच्या कुटुंबीयांनी तपास केला असता आशाबाई बहिणीच्या घरी गेलीच नसल्याची माहिती मिळाली. गावात तपास केल्यावर गावालगत असलेल्या दगडू पाटील यांच्या विहिरीजवळ आशाची चप्पल दिसली.

त्यामुळे आम्ही विहिरीत शोधले असता आशाचा मृतदेह आढळला. याबाबत शिवदास पुना खैरनार यांच्या माहितीवरून पाराेळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज