fbpx

एरंडोल येथून तरुण बेपत्ता

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । एरंडोल येथील महात्मा फुले पुतळ्या जवळील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे सुरेश विश्वनाथ माळी ( वय ३८) हे हरवले असुन तशी फिर्याद एरंडोल पोलीस स्टेशनला त्यांची पत्नी योगिता माळी यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सुरेश माळी हे दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एरंडोल येथील घरून नवसारी ( गुजरात) येथे आई आजारी असल्याने तिला बघण्यासाठी निघाले.परंतु १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेला सुरेश यांच्या आईने सूनबाई योगिता माळी हिस फोन करुन सांगितले की सुरेश हा नवसारी येथे पोहचला नाही.

त्यामुळे योगिता,सासू, सासरे व दिर यांनी धरणगाव रेल्वे स्टेशन व गावात सुरेश यांचा शोध घेतला पण ते मिळुन आले नाही.सुरेश हे ५ फुट ५ इंच उंचीचे असुन,रंगाने सावळे आहेत, नाक सरळ,डोळे काळे,केस विरळ काळे,अंगात पांढऱ्या रंगाचे टी शर्ट व काळी पँट घातलेली आहे.पुढील तपास एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज