fbpx

जळगावातील तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । शहरातील एका ३२ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना काल रात्री हरिविठ्ठल नगर परिसराजवळ घडली. योगेश गुलाब गायकवाड (वय ३२,रा.खंडेराव नगर) असे मयत तरूणाचे नाव असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश याची पत्नी काही दिवसापासून माहेरी गेलेली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास योगेश घराबाहेर निघाला. जाताना कुठे चाललो, काय काम आहे याबाबत त्याने कोणालाच काही सांगितले नाही. रात्री योगेश याने धावत्या रेल्वेसमोर झोकून आत्महत्या केली. हरिविठ्ठल नगर परिसरातील लोखंडी पूलावर खांबा क्रमांक १४६/२० येथे आत्महत्या केल्याची  माहिती रेल्वेकडून मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सुशील चौधरी व प्रवीण जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. खिशातील कागदपत्रे व नातेवाईकाकडून शोध घेतला जात असतानाच त्याची ओळख पटली. योगेश हा मनपाच्या मलेरिया विभागात कार्यरत होता. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे.  दरम्यान, योगेश याच्या पश्चात पत्नी डिंपल, मुलगा कुणाल (वय ११), पवन (६), आई सिंधूबाई, भाऊ भारत व अनिल असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज