fbpx

दोन दुचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना रात्री अमळनेर तालुक्यातील डांगर गावाजवळ घडली.

तालुक्यातील जानवे येथील आधार लखा पाटील (वय ४२) हे दररोज दूध विक्रीसाठी धुळे येथे जात असत. २६ रोजी ते रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास धुळ्याहून दूध विक्री करून धार पाटील हे दुचाकी (एमएच- १९, बीई- ८७९०)ने जानवे येथे परत येत असताना डांगर जवळील तांबोडे नाल्याजवळ रमेश उदा पाटील यांच्या शेतासमोर जानव्याकडून येणारी दुचाकी (एमएच- १९, डीडी- २७१)ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. 

या अपघातात आधार पाटील खाली पडले व त्यांच्या तोंडाला डोक्याला गंभीर इजा झाली. अपघाताचे वृत्त कळताच सुभाष भिला पाटील, गोपाळ शांताराम पाटील, भय्या वसंत पाटील, संजय सुभाष पाटील, रवींद्र रमेश पाटील यांनी धाव घेत रुग्णवाहिका मागवली. मात्र, डॉक्टरांनी आधार पाटील यांना मृत घोषित केले. त्यांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. 

दरम्यान, या अपघातातील दुसरा दुचाकीस्वार डांगर येथील असल्याचे समजते. त्याचा ही पाय फ्रॅक्चर झाला आहे. या संदर्भात अमळनेर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज