fbpx

टाटा इंडिका गाडीची मोटारसायकलला धडक, फैजपूरचा तरुण ठार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । फैजपूरकडून  भुसावळकडे जाणाऱ्या टाटा इंडिका गाडीने मोटासायकलस्वारास धडक दिल्याने मोटारसायलस्वार ठार झाल्याची घटना फैजपूर भुसावळ रोडवर बामणोदच्या स्मशानभूमी जवळ घडली.

वृत्त असे की, फैजपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १८ जून  रोजी फैजपूरकडून टाटा इंडिका गाडी (क्रमांक एम.एच ४७ एन. ३११३) चालक गोपाळ किसन बाऱ्हे (रा.भुसावळ) हा इसम निष्काळजीपणाने भरधाव वेगात गाडी चालवून समोरून येणाऱ्या गाडीकडे दुर्लक्ष करत भुसावळ कडे जात असतांना बामणोद कडून फैजपूर कडे येणारा तरुण दीपक मधुकर पाटील (वय ३९ रा.फैजपूर) हा मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९ ए. झेड ८१०३ हा तरुण काम आटोपून फैजपूर येथे असतांना फैजपूर भुसावळ रोडवरील बामणोदचा स्मशानभूमी जवळ इंडिका कारने धडक दिल्याने गंभीर जखमी अवस्थेत फैजपूरच्या खासगी रुग्णालांमध्ये आणताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याबाबत फैजपूर पोलिस स्टेशनला भाग क्र. ७६ /२०२१ भादवी कलम  ३०४, २७९, ३३७,३३८,४२७, मोटर वेहिकल १८४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आला असून इंडिका चालक गोपाळ किसन बाऱ्हे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. रोहिदास ठोंबरे करीत आहे. मयत अविवाहित तरुण दीपक मधुकर पाटील हा एकुलता एक असल्याने फैजपूर सह परिसरात शोकाकुल पसरला आहे. मयत दीपक पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt