fbpx

भुसावळातील तरुणाची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । भुसावळात एका ३५वर्षीय तरुणाने तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनंजय सुनील आंबोळकर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरातल्या कोळीवाड्यातील रहिवासी धनंजय आंबोळकर हा एका फायनान्स कंपनीत कामाला होता. दरम्यान, आज सकाळी त्याने तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या कोणत्या कारणावरून केली ही माहिती समोर आली नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक भीमराज कोळी, युवराज पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तापी नदीच्या पुलावर धाव घेतली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहर पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज