सुकी नदीत बुडून निंभोऱ्यातील तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील निंभोरा येथील १८ वर्षीय तरुणाचा सुकी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गितेश विकास ढाके (वय १८) असे या मृत तरुणाचे नाव असून संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत असे कि, निंभोरा येथील गितेश ढाके हा तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. दसऱ्याच्या दिवशी (दि.१५) गीतेश ढाके हा सायंकाळी मित्राकडे जातो, असे सांगून घरून गेला. मात्र, तो परत आलाच नाही. सर्वत्र शोध घेऊन देखील तो आढळला नाही. दरम्यान, १६ रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद झाली. १८ रोजी सकाळी गीतेशचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळला. या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विकास कोल्हे करत आहेत.

दरम्यान, मध्यंतरी झालेल्या आणि दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अनेक धरण फुल भरली आहे. काही धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज