fbpx

गच्ची साफ करीत असतांना तरुणाचा इलेक्ट्रिक तारांचा शॉक लागून मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । चोपडा शहरातील महावीर नगरातील रहिवासी युवकाचा घराची गच्ची साफ सफाई करीत असतांना इलेक्ट्रिक तारांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. सोपान कोळी असे मृत युवकाचे नाव आहे. 

याबाबत प्राप्त माहितीनुसार, सोपान कोळी हा आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या गच्चीवर साफ-सफाई करीत होता. यावेळी घरावरून गेलेल्या ११ हजार केव्हीच्या हायपर टेन्शन इलेक्ट्रिक तारांना हातातील लोखंडी सळईचा स्पर्श लागल्याने शॉक लागून तो जमीनीवर आदळला. 

त्यास उपचारासाठी पाटील अक्सिडेंट हाॅस्पिटलला दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यास सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात आई व लहान बंधू विपुल हा आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज