तरुणाची ग्रा.पं.च्या विहीरीत पडल्याने मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । पिंपळकोठा बु ( ता. एरंडोल ) येथे रविंद्र साहेबराव पाटील (वय ३५, ) यांचा येथील ग्रामपंचायतीच्या विहीरीत पडून मृत्यू झाला. ही घटना ३ डिसेंबर रोजी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बु येथे रविंद्र साहेबराव पाटील ( वय ३५)  यांचा येथील ग्रामपंचायतीच्या विहीरीत पडून मृत्यू झाला. ही घटना ३ डिसेंबर रोजी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शंभुसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक रविंद्र तायडे हे पुढील तपास करीत आहेत.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -