fbpx

प्रेम कहाणीत ट्विस्ट, तरुणाने कापली हाताची नस

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । विवाहित महिलेच्या प्रेमातून एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडली. दीपक संजय पाटील (२७) असे आरोपीचे नाव आहे. तो एनगाव (जि.जळगाव) येथील रहिवासी आहे.

बेलतरोडीतील दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षांच्या एका महिलेसोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली. नंतर टॅक्सी ड्रायव्हर असलेला पाटील गेल्या वर्षी नागपुरात आला. त्याने महिलेशी संपर्क साधून तिचा पत्ता जाणून घेतला आणि तिच्या घरी पोहोचला. तेथे त्याने जाणे-येणे वाढविल्याने या दोघांचे सूत जुळले. बरेच दिवस त्यांचे प्रेमसंबंध गुपचूप सुरू होते. ३० जुलै २०२० रोजी त्याने या महिलेला जळगावला पळवून नेले. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाइलवरून माग काढून जळगाव गाठले. तेथे त्यांनी महिलेला विचारपूस केली असता मी स्वमर्जीने पाटीलसोबत आले आणि आता मला परत यायचे नाही. पाटील सोबतच राहायचे आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे पोलीस परत आले.

तब्बल सात महिने हे दोघे जळगावला पती-पत्नीसारखे राहत होते. नंतर त्यांच्यात खटके उडाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ही महिला नागपुरात घरी परतली. नवऱ्यानेही तिला स्वीकारले. सर्व सुरळीत असताना पाटील पुन्हा नागपुरात परतला. त्याने महिलेचे घर गाठले. तेथेच दोन दिवस मुक्काम ठोकला आणि तिला सोमवारी दुपारी जळगावला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करू लागला. महिलेने नकार दिला. त्यामुळे त्याने दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज