fbpx

सततच्या लॉकडाऊनला कंटाळून नाभिकाची आत्महत्या ; खिशात सापडली चिठ्ठी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ एप्रिल २०२१ । राज्यासह जिल्ह्यातील विविध भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन लावला आहे. दरम्यान, या सततच्या लॉकडाऊनला कंटाळून नाभिक समाजातील तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील बोरअंजटी शिवारात उघडकीस आली.  गणेश सुभाष सैंदाणे (वय ३२) असे या तरूणाचे नाव आहे. 

दरम्यान, या तरुणाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात ‘मला कोरोना होता, मी परवा बरा झालो, माझी मानसिक व आर्थिक स्थिती ढासळली आहे’, असे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तालुक्यातील वैजापूर येथे अनेक वर्षांपासून गणेश सैंदाणे हे सलून व्यवसाय करतात. सततच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायावर परीणाम झाला होता म्हणूनच त्यांनी आत्महत्याचे पाऊल उचलल्याचे बाेलले जात आहे. बुधवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास बोरअंजटी शिवारात गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. 

१५ दिवसांपूर्वी सैंदाणे हे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना रुग्णालयात जायला देखील पैसे नव्हते, त्यांनी घरीच उपचार केले होते. लाॅकडाऊनमध्ये सलून व्यवसाय अनेक दिवस बंद असल्याने आर्थिक संकटात सापडल्याची माहिती नाभिक समाजाचे उमाकांत निकम यांनी दिली. ते सध्या चोपडा शहरातील आदर्श नगर येथे राहत होते. स्वतःचे अनेक वर्षांपासून वैजापूर गावी सलून दुकान असून ते हे दुकान चालवत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज