fbpx

भुसावळच्या तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

mi-advt

भुसावळ येथे हिंदी विद्यालयात कारकून असलेल्या ३५ वर्षीय तरुणाने जळगावातील बजरंग बोगदा पुलावर शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. मात्र, कौटुंबिक कारणातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

राहुल राजाराम निलम (वय ३५, रा. सिध्दीविनायक पार्क, हरिओम नगर जळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. तो भुसावळ येथील संत गाडगेमहाराज हिंदी हायस्कूलमध्ये कारकून म्हणून गेल्या दहा वर्षांपासून नोकरीला होता.

त्याने बजरंग बोगद्यावरील पुलावरील रुळावर झोपून आत्महत्या केली. त्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली. राहुलचा भाऊ राकेश नीलम यांनी त्यांचा मृतदेह ओळखून हंबरडा फोडला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt