आजाराला कंटाळून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । आजाराला कंटाळून एका ३१ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. रविंद्र प्रभाकर जावळे (वय-३१) असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना यावल तालुक्यातील भालोद येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, भालोद येथील रविंद्र जावळे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून दुर्धर आजाराला कंटाळून त्याने भालोद-बामणोद रोडवर एकविरा देवीच्या मंदीराजवळ असलेल्या अशोक चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी रविंद्र जावळे याने विहिरीजवळ अंगावरील कपडे व चप्पल विहिरीच्या काठाजवळ ठेवली होती. शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी गावातील काही नागरीकांना अंगावरील कपडे आणि चप्पल आढळून आल्याने हा आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मयत रविंद याला दुर्धर आजार जाडला होता.

या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना सांगितले. यावल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक किरण चाटे करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -