किनगावात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | २६ ऑगस्ट २०२१ | यावल तालुक्यातील किनगाव येथील राहणाऱ्या एका तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. दगडु यादव धनगर (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत यावल पोलीसात अवसमात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, यावल तालुक्यातीत किनगाव गावात दि.२५ ऑगस्ट रोजी सकाळी दगडु धनगर या तरूणाने आपल्या राहत्या घरातील मागच्या खोलीत रात्री २ वाजताच्या सुमारास झोपला असता घरातीत सुतळी पटयाने घराच्या छताला असलेल्या लाकडी दांडयाला बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या घटनेची खबर सचिन रामकृष्ण धनगर वय३६ वर्ष राहणार किनगाव यांने दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. तरूण दगड्ड धनगर याने आत्महत्या केली याचा स्पष्ठ कारण कळाले नसले तरी काही दिवसांपासुन त्याचे मानसीक संतुलन बिघड्ल्याचे कळाले असुन यातच त्याने आत्महत्या केली असावी असा कयास आहें.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -