जळगावात युवकाने घेतला गळफास, कारण अस्पष्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी उघडकीस आली आहे. विजय माणिक महाजन (वय-३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नसून याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, विजय महाजन हा शहरातील गेंदालाल मिल परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. तो शहरातील एका कंपनीत नोकरीस असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. कौटुंबिक कारणावरुन विजय महाजन यांनी गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना शेजाऱ्यांंच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर तात्काळ कुटुंबियांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने विजय याला खाली उतरवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज