fbpx

आजाराला कंटाळून युवकाने घेतला शाळेच्या आवारात गळफास

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहरातील पांझरपोळ परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय युवकाने पोटाच्या आजाराला कंटाळून काशीबाई कोल्हे महाविद्यालयाजवळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दिनेश कमलाकर ठाकूर (वय-२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, दिनेश हा आपल्या आई कल्पनाबाई यांच्यासह राहतो. तो एमआयडीसीतील स्टार फेब्रिकेटरमध्ये कामाला आहे. मोठा विवाहित भाऊ गोपाल हा पत्नीसह धुळे येथे राहतो.

mi advt

दरम्यान, मागील काही महिन्यापासून दिनेश याला मुतखडासह पोटाचा आजार होता. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. काल बुधवारी दिनेश याने मित्रास भेटण्यासाठी जातो असे आईला सांगून घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत घरी आला नव्हता.

परंतु आज सकाळी त्याच्या मित्राला काशीबाई कोल्हे महाविद्यालयाजवळी झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले.  याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ संजय शेलार करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज