fbpx

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील योगेश्वर नगरातील ३८ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. मनोहर शेनफडू माळी (वय-३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी  शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनोहर माळी  हे योगेश्वर नगर येथे वास्तव्यास आहे.  मनोहर हा मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान रात्री कुटुंबियांसह जेवण करून झोपले. मध्यरात्री दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण नेमके कळू शकले नाही. 

नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी डॉ. भोळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज इंद्रकर करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज