धावत्या रेल्वेखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । औरंगाबाद जिल्ह्यातील सध्या जळगाव शहरातील खंडेराव नगरात राहणाऱ्या सुरेश नामदेव महाले (वय-३५) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. हे घटना रात्री जळगाव शिरसोली दरम्यान उघकीस आली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नसून याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील मूळ रहिवाशी असलेला व सध्या जळगावातील खंडेराव नगरमध्ये सुरेश महाले हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्याला आहे. महाले हे सेट्रींग काम करुन उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी सोमवारी रात्री खंडेराव नगर परिसरात धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या मृतदेह जळगाव शिरसोली दरम्यान खंबा क्रमांक ४१६/२५ ते २७ दरम्यानच्या डाऊन रेल्वेरूळावर आढळून आला

या संदर्भात उपस्टेशन प्रबंधक अमरचंद मुलचंद अग्रवाल यांनी दिलेल्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लालसिंग बारेला तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत परिसरातील नागरीकांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यांच्या पश्चात पत्नी ललिताबाई व शितल, पुजा, सुप्रिया ह्या तीन मुली असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -