विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील गणपूर येथील तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. भावसाहेब दिगंबर कुमावत (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ही घटना आज शनिवारी उघडकीस आली. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत असे की, गणपूर येथील भावसाहेब कुमावत यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेहाला चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.

भावसाहेब यांच्या आत्महत्येचे कारण लगेच समजू शकले नाही वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो नि संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास विजय शिंदे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -