दुचाकीचा कट लागल्याने तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । अग्रवाल हॉस्पीटल येथे दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. विश्वदिप कैलास सोनवणे ( वय, पुर्ण नाव माहिती नाही ) रत्नदीप ( वय, पुर्ण नाव माहित नाही ) असे  मारहाण करणाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून दोन जणांवर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, जळगाव शहरातील अग्रवाल हॉस्पिटल जवळील बोगद्याजवळून सचिन धनराज पाटील ( वय-२६ ) रा. बालाजी पेठ जळगाव हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ ९४०२) ने कामानिमित्त एम.जे. कॉलेजकडे जात असतांना बोगद्याजवळ समोरून विश्वदिप कैलास सोनवणे (पुर्ण नाव माहिती नाही) यांची दुचाकी (एमएच १९ यू ३१४९) ला कट लागला. या कारणावरून विश्वदीप आणि सोबत डंपरचालक रत्नदीप (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी शिवीगाळ करून सचिन पाटील याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. जखमी सचिनला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सचिनच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रत्नदीप आणि विश्वदीप कैलास सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रदीप चांदेलकर करीत आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज