तरुणाला मारहाण : रावेर पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची चाैकशी सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । अल्पसंख्यांक समाजातील काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.

अल्पसंख्याक समाजातील मुलांना मारहाण केल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल विशाल पाटील व इतर कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस निरीक्षक कैलास नागरेंसह इतरांनी मोहम्मद बाबरसह काही तरुणांना ३ व ४ नोव्हेंबर रोजी पोलिस ठाण्यात बंदीस्त केले व डांबून ठेवत मारहाण करुन पैशांची मागणी केली, जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप अब्दुल रहमान शेख करीम यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन दिले. यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी चौकशीला सुरूवात केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज