जुन्या वादातून तरुणास चार जणांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । आसोदा येथे २५ वर्षीय तरूणाला जुन्या वादातून चार जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. राकेश सपकाळे असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या जबाबावरून चार जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लिलाधर महाजन हे करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की, आसोदा येथील शिवाजी चौक कोळीवाड्यात राकेश गिरधर सपकाळे (वय २५) हा तरुण कुटुंबियांसह राहतो. रविवारी राकेश हा रात्री त्याच्या घरासमोर बसलेला असताना, मागील भांडणाच्या कारणावरुन गावातीलच मयुर विजय सपकाळे याच्यासह चार जणांनी राकेशला मारहाण केली. यात मयुर याने पट्टीसारखी काहीतरी वस्तू राकेशच्या हातावर मारली, तर वैभव विजय सपकाळे याने लोखंडी दांडक्याने मारहाण केली. तर गुरुदास रघुनाथ सपकाळे याने लाथाबुक्क्यांनी तर भरत उर्फ विशाल अशोक सपकाळे याने राकेशला लोखंडी आसारीने पायावर तसेच मांडीवर मारहाण केली.
घटनेत जखमी राकेशच्या तक्रारीवरुन मयुर सपकाळे, वैभव सपकाळे, गुरुदास सपकाळे व भरत उर्फ विशाल सपकाळे सर्व रा. आसादो या चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लिलाधर महाजन हे करीत आहेत.
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज