fbpx

किनगाव येथे मांडी कापली गेल्याने तरुण ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा कटर मशीनमुळे मांडी कापली गेल्याची घटना १०.३० च्या सुमारास घडली. दरम्यान, अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

किनगाव येथील रहिवासी असलेला सोपान शंकर मिस्तरी वय-३५ हा तरुण मिस्तरी काम करतो. शनिवारी सकाळी तो काम करीत असताना अचानक कटर मशीन उलट आल्याने त्याची मांडी कापली गेली.

mi advt

 तरुणासोबत असलेल्यांनी त्याला लागलीच किनगाव रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी त्याला जळगाव येथे पाठवले. जळगाव जिल्हा रुग्णालयात आणले असता सीएमओ डॉ.अहिरे यांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाच्या मागे भाऊ असून त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज