fbpx

तरुणीची आत्महत्या : झिराे पाेलिसाविरूध्द गुन्हा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । दि.२२ मे २०२१ । भुसावळ – लग्नाला नकार दिल्याने संशयित त्रास देत असल्याने त्यास वैतागून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण अशाेककुमार थारवानी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे शिवाय तो झिरो पोलीस असल्याचीही चर्चा आहे.

शहरातील सिंधी काॅलनीतील रहिवासी हर्षलीन हीचे नारायण साेबत प्रेमसंबंध हाेते, मात्र हर्षलिनने आरोपीसाेबत लग्नाला नकार दिल्याने ताे हर्षलिनला त्रास देत हाेताच व माेबाईलवर धमकीचे संदेश देत हाेता. या सर्व प्रकाराला कंटाळून हर्षलिन हीने ८ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नारायण हा धमकी देऊन त्रास देत हाेता, अशी माहिती मृत्यूपूर्वी हर्षलिनने तिच्या आईला दिली हाेती, मी विवाहास नकार दिल्याने ताे त्रास देताे असे तिने आईला सांगितले होते या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याने आरोपीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मंजू साेढाइ यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली. सहा.पाेलिस निरीक्षक अनिल माेरे, समाधान पाटील पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज