कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजते.

धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील शेतकरी शरद काशिनाथ पाटील यांच्या पत्नी गावाला गेलेल्या असून मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मुलगी चहा ठेवण्यासाठी घरात गेली असता तिला घडलेला प्रकार दिसला. कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजते. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar