फवारणी करताना नाका-तोंडात औषध गेल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । पारोळा तालुक्यातील तरवाडे खुर्द येथील ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेतात पिकावर फवारणी करत असताना नाका-तोंडात औषध गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना १७ रोजी घडली. पांडुरंग शिवाजी चौधरी (वय ३५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत असे की,  पांडुरंग चौधरी हे १७ रोजी सकाळी ७ वाजता कापसाच्या पिकाला फवारणी करण्यासाठी जात अाहे, असे कुटुंबीयांना सांगून गेले. त्यानंतर सुनील चाैधरी हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास पांडुरंग चौधरी यांचा जेवणाचा डबा देण्यासाठी शेतात गेले. या वेळी बोरीच्या झाडाजवळ पांडुरंग चाैधरी हे फवारणी पंपासह पडलेले दिसले.

ते बेशुद्ध हाेते व त्यांच्या त्यानंतर सुनील चाैधरी यांनी तत्काळ चुलत काका तथा पाेलिस पाटील राजपाल तापीराम चौधरी, संदीप गणेश पाटील व सुमित लालसिंग पाटील यांना माहिती दिली. त्यांनी चौधरी यांना कुटीर रुग्णालय दाखल केले. तपासणी करुन डॉक्टरांनी चाैधरी यांना दुपारी २ वाजता मृत घोषित केले. तपास पोलिस सुधीर चौधरी करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज