fbpx

तरुण कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । वरणगाव आयुध निर्माणीमध्ये कार्यरत असलेल्या एका तरुण कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार सायंकाळी घडली. संदीप प्रकाश सपकाळे (३३) असे या तरुणाचे नाव आहे. या आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय.

आयुध निर्माणीमध्ये लिपिकपदी कार्यरत असलेले कर्मचारी संदीप प्रकाश सपकाळे (३३) यांनी राहत्या घरात क्वॉर्टर नंबर १९५, टाईप ‘ए’मध्ये घरी कोणी नसताना घरातील छताच्या हुकाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

mi advt

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला नरेंद्र खंडू इंदिश यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार नरसिंग चव्हाण करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज