खडकी ब्रु.पुलावर अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव येथे कामानिमित्त आलेल्या २५ वर्षीय तरूणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील खडकी बुद्रुक येथील पुलाजवळ घडली आहे. चाळीसगावजवळ एकाच दिवसात २ वेगवेगळ्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे.

तालुक्यातील चत्रभुज तांडा (शिंदी) येथील सागर रामसिंग पवार (वय-२५) हा तरूण वैयक्तिक कामानिमित्त मित्रांसमवेत चाळीसगाव येथे आलेला होता. दरम्यान काम आटोपल्यानंतर आपल्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीने क्र. एम.एच.१९ बी.टी. ५२४८ ने चाळीसगावहून घरी जात असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरातील खडकी बुद्रुक येथील पुलाजवळ झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून पंचनामा करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास मुकेश पाटील व भटू पाटील हे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -