संजय गांधी निराधार योजनेच्या यावल तालुका सदस्यपदी योगिता पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । विरावली येथील रहिवासी छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या सचिव सौ.योगिता देवकांत पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका सदस्यपदी निवड झाली आहे. विरावली ग्रामपंचायतीच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या सौ.शोभा पाटील, शकुंतला पाटील, हमिदा तडवी व ग्रा.प. सदस्य तथा यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी योगिता पाटील यांचा सत्कार करत अभिनंदन केले

सौ.योगिता पाटील यांची जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी संजय गांधी निराधार योजनेत नियुक्ती केल्या बद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावल तालुक्यातून विरावली गावाला पहिल्यादाच एका उच्च शिक्षित महिला प्रतिनिधीलाच्या नावाला शिफारस केल्याबद्दल यावल -रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी निवड केल्या बद्दल आभार मानले. विरावली गावसह परिसरातील तालुक्यातील सर्व निराधार महिला ना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे योगिता देवकांत पाटील यांनी सांगितले.

यावल तालुक्यातील सर्वसामान्य गोर- गरीब-गरजू निराधार लोकांच्या हिता साठी काम करण्याची जबाबदारी दिल्या बद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जळगांव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भैय्यासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताईनगर विधान सभेचे आमदार चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले, विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र सोनवणे, यांचे आभार मानले आहे. सौ योगिता पाटील यांचे नियुक्ती झाल्याबद्दल विरावली गावसह सह तालुक्यातून सामाजिक व राजकीय क्षेत्रातुनसौ पाटील यांना मान्यवरांनी अभिनंदनसह पुढील भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्या दिल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज