राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत योगेश्वरी मराठेला कांस्यपदक

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची खेळाडू योगेश्वरी अनिल मराठे हिने दि.२६ ऑक्टोबर रोजी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले.

योगेश्वरी मराठेला भानुदास आरखे व अनिल मराठे यांनी प्रशिक्षण दिले असून गुरु हनुमान कुस्तीगीर संघाच्या सदस्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महिला कुस्तीगीर गटात योगेश्वरी मराठेचे यश सर्वांनाच प्रेरणादायी आहे. योगेश्वरीच्या या यशाबद्दल जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष राजीव देशमुख, कार्याध्यक्ष शिवाजी राजपूत, सचिव सुनील देशमुख, ऍड. किशोर काळकर , प्रा. मनोज पाटील, संजय काबरा, पंकज काबरा, सनी जाधव, शरवण सैनी, नितीन चौधरी, राजू चौधरी, किशोर निंबाळकर, चंद्रकांत महाजन आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज